ACZoom Home E-mail ITRANS ITRANS Song Book

% ITRANS Song #
% --------------
% 85.s isongs output
\stitle{saagaraa praaN taLamaLalaa}%
\film{}%
\starring{}%
\singer{Lata, Usha, Hridaynath, Asha}%
\music{}%
\lyrics{}%
% --------------
% Contributor: 
% Transliterator: Niranjan R Pedanekar  
% Credits: 
% Editor: 
%


%
	|| सागरा प्राण तळमळला ||

गायक: लता, उषा, हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले
गीत: स्वातंत्र्यवीर सावरकर

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला, तळमळला, सागरा...धृ.

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तयी जननीहृद् विरहशंकितही झाले, परि तुवा वचन तिज दिधले
मागर्ज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन, त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभव योगे बनुनी मी
तव अधिकशक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथुन सोडिले तिजला...१.

शुकपञ्जरी वा हरीण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी 
भूविरह कसा सतत साहू यापुढती, दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यथर् भार विद्येचा  
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे 
तो बालगुलाबही आता रे, फुलबाग मला हाय पारखा झाला...२.

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा, मज भरतभूमीचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी, आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य प्रिय मज साचा, वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यथर् हे आता रे, बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला...३.

या फेनमिषे हससी निदर्या कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देशी
जरि आंग्लभूमीभयभीता रे, अबला न माझीही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला...४.
%

% 
% send songs, corrections, etc to Anurag Shankar (anurag@astro.indiana.edu)